क्षेत्रमाहात्म्य

morgaon-home-banner-after-img

श्री ब्रम्ह कमंडलू गंगा (कऱ्हा नदी)

ब्रह्मकमंडलू गंगेच्या म्हणजेच या कऱ्हा नदीच्या उगमाची कथाही मोठी रोचक आहे. एकदा भगवान ब्रह्मदेव भगवान श्री मयुरेश्वराच्या दर्शनासाठी आले. पूजन झाल्यानंतर प्रदक्षिणा करत असताना त्यांचा पाय त्यांच्या कमंडलूला लागला. तो कमंडलू ऊडून खूप लांबवर जाऊन पडला. त्यातील ते स्वर्गीय जल वाहायला सुरुवात झाली. श्री ब्रह्मदेवांनी आपल्या योगमायेने त्याला पुन्हा आकर्षित करणे सुरू केले त्यावेळी आकाशवाणी झाली की, “हे ब्रह्मदेवा, आता हे जल असेच वाहू द्या. यातून एक नदी निर्माण होईल.” श्री ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून निर्माण झाली म्हणून तिला ब्रह्मकमंडलू गंगा असे नाव पडले. सामान्य व्यवहारात या नदीला कऱ्हा नदी असे म्हणतात. सध्याच्या सासवड जवळ तिचा उगम असून तेथे भगवान ब्रह्मदेवांचे स्थान आहे. श्रीक्षेत्र मोरगावला तिचा मध्य असून तेथे येथे मध्यमेश्वर नावाने भगवान शंकरांचे स्थान आहे आणि पुढे जाऊन जेथे ती नीरा नदीला मिळते तेथे संगमावर भगवान विष्णूंचे स्थान आहे.

morgaon-leave-img-divider
मराठी english